पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिर्झापूर' (HBD Divyenndu Sharma) या वेबसिरीजमधील मुन्ना भैयाला कोण ओळखत नाही? त्याचे खरे नाव दिव्यांदू शर्मा आहे. वेब सीरिजमध्ये त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याचा अभिनय थक्क करणारा आहे. मात्र, याआधीही त्याने 'प्यार का पंचनामा' चित्रपटात त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आज, १८ जून रोजी दिव्यांदू शर्मा त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. (HBD Divyenndu Sharma)
दिव्यांदू शर्मा हा असाच एक कलाकार आहे, ज्याने थिएटरच्या जगात नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जगातून ठसा उमटवला आहे. जेव्हा ओटीटीबद्दल फारसे कोणालाच माहित नव्हते, तेव्हा दिव्यांदू शर्मा तिथला स्टार मानले जात होते.
दिव्यांदू शर्माने खऱ्या आयुष्यात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न केले आहे. त्याची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. दिव्यांदूच्या पत्नीचे नाव आकांक्षा शर्मा आहे. ती एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या हिरोईनपेक्षा कमी नाही. खऱ्या आयुष्यात ती ग्लॅमरस आहे. भल्याभल्या अभिनेत्रींना ती टक्कर देताना दिसते. अर्थात आकांक्षा शर्मा अभिनेत्री नसली तरी ती एखाद्या दिवापेक्षा कमी नाही.
रिपोर्ट्सनुसार, दिव्यांदूने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो कॉलेजच्या काळात आकांक्षा शर्माला भेटला होता. दोघेही चांगले मित्र बनले आणि जवळपास ६-७ वर्षे दोघेही चांगले मित्र राहिले. मनात पहिल्या दिवसापासून आकांक्षाबद्दल प्रेम होते. पण तो तिच्यासमोर प्रेम कधीच व्यक्त करू शकला नाही. ६-७ वर्षे बेस्ट फ्रेंड राहिल्यानंतर दोघेही प्रेमात पडले.
२०११ मध्ये जेव्हा दिव्यांदूने 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिने आकांक्षा शर्मासमोर आपले प्रेम व्यक्त केले. दोघांचे लग्न झाले. दिव्यांदू आपल्या पत्नीच्या ग्लॅमरस लूकचे कौतुक करतो. तो अनेकदा पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. तो आकांक्षा शर्माचे खूप कौतुक करतो. दोघांच्या फोटोंमध्ये जबरदस्त केमिस्ट्रीही पाहायला मिळते. आकांक्षा शर्मा पेशाने ज्वेलरी डिझायनर आहे. ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहणे पसंत करते.