Latest

इराण पोलिसांची क्रूरता! हिजाब न घातल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण, ब्रेन डेड घोषित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : १६ वर्षीय अल्पवयीन मुलगीने हिजाब न घातल्याने इराण पोलिसांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालीय. रुग्णालयात तिचे ब्रेन डेड घोषित करण्यात आले आहे. तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. हिजाब कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तिला मारहाण केल्याची माहिती समोर आलीय. ही घटना या महिन्याच्या सुरुवातीची असल्याचे म्हटले जात आहे. अर्मिता गेरावंड असे तिचे नाव असून ती कोम्यात गेल्याची माहिती समोर आलीय.

संबंधित बातम्या –

फोटो व्हायरल

कुर्दिश-इराणी हेंगॉ जैसे मानवाधिकार संघटनांनी सर्वप्रथम अर्मिता गेरावंड रुग्णालयात दाखल करण्य़ात आल्याचे वृत्त सार्वजनिक केले होते. आणि सोशल मीडियावर १६ वर्षीय मुलीचा फोटो प्रकाशित केला होता. या फोटोत अर्मिताच्या डोक्यावर पट्टी, लाईफ सपोर्ट सिस्टम आणि रेस्पिरेटरी ट्यूब दिसत होती.

मेहसा अमिनीलादेखील अशाच प्रकारे मारहाण

मानवाधिकार कार्यकर्त्यांचे हे म्हणणे आहे की, गेरावंडची स्थिती महसा अमिनी सारखी होऊ शकते. तिची मागील वर्षी पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक महिने देशभरात सरकार विरोधी आंदोलने झाली. मेहसा अमिनीदेखील हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आली होती. पोलिसांनी तिला इतक्या क्रूरतेने मारहाण केली होती की, मेहसाचा मृत्यू झाला होता.

photo – centerforhumanrights Instagram वरून साभार

इराणने फेटाळले आरोप

इराणने या गोष्टीला नकार दिला आहे की, गेरावंड ही पोलिसांकडून जखमी झालीय. मीडया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, गेरावंड हिला तेहरान मेट्रोमध्ये अनिवार्य इस्लामिक ड्रेस कोड लागू करणाऱ्या अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी बेदम मारहाण केलीय.

SCROLL FOR NEXT