Latest

व्हॉट्सॲप डाउन : भारताकडून ‘मेटा’ला अहवाल सादर करण्याचे निर्देश

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संदेश वहनासाठी वापरण्यात येणारे मॅसेंजिंग अँप व्हॉट्सॲप मंगळवारी (दि.२५) दुपारी साडेबारा वाजेपासून दोन तास ठप्प झाले होते. यामुळे देशातील कोट्यवधी यूजर्संना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे संचालन करणाऱ्या 'मेटा' कंपनीला (व्हॉट्सॲप डाउन) उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रालयाअंतर्गत असलेली नोडल एजेन्सी भारतीय कम्प्युटर इमरजेंन्सी रिस्पॉस टीमकडे मेटा कंपनीला त्यांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. अशाप्रकारच्या घटना घडतात तेव्हा मंत्रालयाकडून संबंधित कंपनीजवळून अहवाल मागवून घेतला जातो, त्यामुळे या घटनेचा खुलासा करणारा अहवाल व्हॉट्सॲपची पेरेंट कंपनी असलेल्या मेटाकडे (व्हॉट्सॲप डाउन) मागण्यात आला आहे.

मंगळवारी अनेक देशात व्हॉट्सॲपची सेवा तब्बल दोन तास ठप्प पडली होती. अद्यापतरी कंपनीकडून या तांत्रिक बिघाडामागचे कारण सांगण्यात आलेले नाही. जगभरात व्हॉट्सॲपचे २ अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने यूजर्संनी टेलिग्राम वापराला प्राधान्य दिले होते. अशात मंत्रालयाकडून मागवण्यात आलेल्या अहवालातून मेटा कंपनी काय उत्तर सादर (व्हॉट्सॲप डाउन) करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागीलवर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने व्हॉट्सॲप ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सॲप डाऊन झाले होते. ट्वीटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत होते. व्हॉट्सॲप सर्व्हर क्रॅश (व्हॉट्सॲप डाउन) झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT