पुढारी ऑनलाइन डेस्क : COVID-19 Vaccination:कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने 200 कोटींचे लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
COVID-19 Vaccination:कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड-दोन वर्षात संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशात या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे अति आवश्यक आहे. भारताने हे आव्हान स्वीकारून देशातच लस विकसित करून कोरोना लसीकरण मोहीम (COVID-19 Vaccination)संपूर्ण देशात वेगाने राबवली जाता आहे. खूप कमी कालावधीत भारताने 200 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. यामुळे जगभरातून यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
यावर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कोरोना संक्रमण प्रभावाला कमी करण्यासाठी भारतीय लस निर्माते आणि सरकार सोबत निरंतर भागीदारीत राहण्याबाबत आभारही व्यक्त केले आहे.
बिल गेट्स यांनी लिहिले आहे, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी 200 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा गाठणे हा या अभियानातील मैलाचा दगड आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. तसेच आम्ही भारतीय लस निर्माते आणि भारत सरकारच्या कोरोनाच्या संक्रमणाच्या प्रभावाला कमी करण्याच्या निरंतर भागीदारीबाबत आभारी आहोत.
COVID-19 Vaccination अभियानाची सुरुवात केल्यानंतर फक्त दीड वर्षातच भारताने रविवारी (दि17 जुलै) 200 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रविवारी भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे, असे म्हटले होते.
हे ही वाचा :