Latest

Messi vs Ronaldo : रोनाल्डो-मेस्सी भिडणार; १९ जानेवारीला होणार महामुकाबला

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पॅरिस सेंट जर्मेन (PSG) विरुद्ध सौदी अरेबियामध्ये अल नासरकडून पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात तो युरोपमधला आपला जुना प्रतिस्पर्धी आणि अर्जेंटिनाला तब्बल ३६ वर्षांनी विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीशी होणार आहे. पी.एस.जी.ने सोमवारी (दि.९) सांगितले की, त्यांचा संघ १९ जानेवारी रोजी रियाध येथे रोनाल्डोचा नवीन क्लब अल नासर आणि अल हिलालच्या यांच्या विरूध्द मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. (Messi vs Ronaldo)

रोनाल्डोला अल नासरकडून खेळण्यासाठी दोन सामन्यांची म्हणजेच २२ जानेवारी पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, विश्वचषक स्पर्धेपूर्वी नोव्हेंबर महिन्यात रोनाल्डोला एका प्रेक्षकासोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने दोन क्लब सामन्यांतून निलंबनाची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेनंतर त्याच्या ही कारवाई करण्यात येत आहे. पी. एस. जी. संघ दोन दिवसांसाठी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे. यामुळे रोनाल्डो विरूध्द मेस्सी असा सामना फुटबॉलप्रेमींना पाहता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Messi vs Ronaldo)

पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदी रॉबर्टो मार्टिनेझ

बेल्जियमचे माजी प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ आता पोर्तुगालचे नवे प्रशिक्षक झाले आहेत. पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस यांनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील निराशाजन पराभवामुळे प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. सॅंटोस यांनी रोनाल्डोला महत्वाच्या दोन सामन्यात मुख्य संघातून वगळले होते. परिणामी पोर्तुगालला मोरोक्कोसारख्या संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्यांच्या टीका झाली होती.

पोर्तुगालच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मार्टिनेझ म्हणाले की, मी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधणार आहे. यामध्ये विश्वचषकात खेळलेल्या २६ खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच संघाचा कर्णधार रोनाल्डोचाही समावेश आहे. १९ वर्षांपासून पोर्तुगाल संघाकडून खेळणारा रोनाल्डोचा मी आदर करतो. सर्व खेळाडूंना समान संधी देणे ही माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियम संघ ग्रुप स्टेजमधून बाद झाल्यानंतर मार्टिनेझ यांनी सहा वर्षांचा करार संपवून प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांची पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT