Latest

Sidhu Moosewala Murder : मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियात अटक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sidhu Moosewala Murder : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार गोल्डीला 20 नोव्हेंबर पूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. मात्र कॅलिफोर्नियाकडून याबाबत अधिकृत वृत्त देण्यात आलेले नाही.

Sidhu Moosewala Murder : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी मानसातील जवाहरके गावात निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्याकांड घडले तेव्हा मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून कुठेतरी जात होता. त्यावेळी 5 ते 6 लोकांनी एकदम घेराव घातला आणि गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला हत्याकांड घडवून आणण्यामध्ये गोल्डी ब्रारचा मुख्य हात आहे. तो या हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात बसून गोल्डी मुसेवाला प्रकरणातील सर्व सूचना देत होता. तसेच त्याच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने लगेचच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हत्येनंतर या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे चकमकीत ठार झाले आहे.

Sidhu Moosewala Murder : गोल्डीला पकडून देणा-याला मुसेवालाच्या वडिलांकडून दोन कोटींचे बक्षीस जाहीर

दरम्यान, सिद्धू मुसेवालाची हत्या होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटून देखील मास्टर माईंड गोल्डी पकडला गेला नसल्यामुळे सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी गोल्डीचा पत्ता सांगणा-याला जमीन विकून दोन कोटी रुपये देऊ, असे जाहीर केले होते. विशेष म्हणजे त्यांनी बक्षीस जाहीर केल्यानंतर एकाच दिवसाने गोल्डीच्या अटकेचे वृत्त आले आहे. मात्र, याची अद्याप खातरजमा झालेली नाही. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा अमेरिकन अधिका-यांशी संपर्क साधत आहेत.

Sidhu Moosewala Murder : कोण आहे गोल्डी ब्रार

गोल्डी ब्रार हा सराईत गुंड असून तो खंडणीचे रॅकेट चालवतो. त्यावर भारतात खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. भारतातून पळून कॅनडात गेल्यानंतर तो तिथूनच आपले हिट पथक आणि व्यवसाय चालवतो, असे सांगितले जाते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT