नगर : दोन पोलिसांमध्ये रंगली फ्रीस्टाईल ! अधिकारी म्हणतात अंतर्गत वाद

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भिंगार पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यांमध्ये भलत्याच कारणाने बुधवारी रात्री वाद झाला. वादाचे रुपांतर एकमेकाची जिरवण्यात झाल्याने पोलिस दलात हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याला गुन्हे शोध पथकातील पोलिसांची कार्यशैली खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. यावर भिंगार पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यांमध्ये झालेल्या धुमचक्रीने शिक्कामोर्तब केले आहे. भिंगार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांमध्ये बुधवारी रात्री वाद झाला. नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे खात्रीलायक पोलिस सूत्रांनी सांगितले.

मात्र, ड्युटी लावण्याच्या कारणावरुन हा वाद झाल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, स्टेशन डायरीत नोंद केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. चोरी, घरफोडी, मंगळसूत्र हिसकावणे, दरोडे असे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी पोलिसांची ऊर्जा आपसात हाणामार्‍या करण्यात खर्च होत असल्याचे भिंगार पोलिस ठाण्यात झालेल्या पोलिसांच्या वादातून स्पष्ट झाले आहे. शहरातील गुन्हे वाढलेले गुन्हे पाहता पोलिसांनी ठाण्यात दादागिरी दाखविण्याऐवजी गुन्हेगारांना जरब कशी बसविता येईल, याचा विचार करावा असा सल्ला सुजान नगरकरच आता पोलिसांना देत आहेत.

गोड फळे चाखण्यासाठी चढाओढ

स्थानिक गुन्हे शाखेकडून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या अवैध धद्यांवर धाडसत्र एसपी ओला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू झाले आहे. एलसीबीकडून या कारवाया होत असताना शहर पोलिस ठाण्यांतील गुन्हे शोध पथके करतात तरी काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीस आले नाही तरी चालतील पण अवैध धद्यांच्या आडून गोड फळे कशी चाखता येतील, यावरच भर असल्याचे दिसून येते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news