Latest

Landslide in Manipur : निसर्ग कोपला : मणिपूरमध्‍ये भूस्खलन, जवानांसह ५५ जण बेपत्ता : बचावकार्य सुरु

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
ईशान्‍य भारतातील मणिपूर राज्‍याला मसुळधार पावासाने झोपडले. यावेळी झालेल्‍या भूस्‍खलनात प्रादेशिक सेनेच्‍या जवानांसह ५५ हून अधिक जण बेपत्ता अआहेत. ( Landslide in Manipur )  ही घटना बुधावारी रात्री उशिरा तुपुल रेल्‍वे स्‍थानकानजीक घडली. युद्‍ध पातळीवर मदतकार्य सुरु असून, आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अनेक जण ढीगार्‍याखाली गाडले गेल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

या दुर्घटनेबाबत नोनी जिल्‍ह्याचे उपायुक्‍तांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, तुपुल यार्ड रेल्‍वे स्‍टेशन नजीक झालेल्‍या भुस्‍खलनात जवानांसह ५५ हून अधिक जण अद्‍याप बेपत्ता  आहेत. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे इजेई नदीलचा प्रवाही बाधित झाला आहे. या फटका नोनी जिल्‍हा मुख्‍यालयाच्‍या डोंगराखालील गावांना बसणार आहे.

Landslide in Manipur : रेल्‍वे कामाच्‍या सुरक्षेसाठी जवान हाेते तैनात

जिरीबाम शहराला इम्‍फाळला रेल्‍वेने जोडण्‍याचे काम सुरु आहे. या कामाच्‍या सुरक्षेसाठी १०७ प्रादेशिक सेनेचे जवानांना तैनात करण्‍यात आले होते. बुधावारी रात्री या लष्‍कराच्‍या छावणी परिसरातच भूस्‍खलन झाले. आज सकाळी आसाम राफल्‍स, मणिपूर पेालीसांनी मतदकार्य सुरु केले असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT