मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्‍ही करून दाखवणार?; राऊतांचा शिंदे गटाला प्रश्न | पुढारी

मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्‍ही करून दाखवणार?; राऊतांचा शिंदे गटाला प्रश्न

पुढारी ऑनलाईन डेस्क; ठाकरे हे कधीच सत्‍तेचे लालसी नव्हते. राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनंती केल्‍याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्‍वीकारले होते. मात्र आपल्‍याच लोकांनी दगाबाजी केल्‍याने आता खुर्चीवर बसण्यात अर्थ नव्हता. विरोधकांचं सरकार पाडण्याचं कॉट्रॅक्‍ट पूर्ण झालं. अशी टीका करत, नवं सरकार पाडण्याचा आम्‍ही प्रयत्‍न करणार नाही. त्‍यांनी महाराष्‍ट्राच्या हितासाठी काम करावं म्‍हणत आपण यापुढे संघटनेच्या कामाला सुरूवात करणार असल्‍याचे सूचक वक्‍तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

महाराष्‍ट्रात प्रथमच काँग्रेस, राष्‍ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकारचा अद्‍भूत प्रयोग आम्‍ही केला होता. जनतेचं सरकार आम्‍ही स्‍थापन केलं होतं. अनेक जन कल्‍याणाचे निर्णय या काळात घेतले गेले. मात्र आपल्‍याच लोकांनी दगाबाजी केल्‍याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता.

ठाकरे सरकार स्‍थापन झाल्‍याच्या पहिल्‍या दिवशीपासून विरोधकांनी हे सरकार पाडण्याच्या कारवाया सुरू केल्‍या होत्‍या. त्‍यांचे उपद्व्याप आम्‍हाला दिसतही होते. मात्र आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्‍याने खुर्चीत बसण्यात अर्थ नव्हता. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्‍न करू नये, असा इशाराही राऊत त्‍यांनी भाजपला दिला.

तुमच्यामुळे पक्षातील आमदार नाराज असल्‍याच्या प्रश्नावर राऊत यांनी तुम्‍हीच ठाकरेंचा घात केला. आता माझ्याकडे बोट का दाखवता असा सवाल केला. पुढे बोलताना त्‍यांनी ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे आमचे स्‍वप्न होते. म्‍हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्‍हणून मी प्रयत्‍न केले. तुम्‍ही सेनेचा मुख्यमंत्री करणार का? असा सवाल त्‍यांनी एकनाथ शिंदे सेनेला केला.

तुम्‍ही स्‍वाभीमान सोडून चाकरी करायला जात आहात. याचा तुम्‍हाला भविष्‍यात पश्चाताप होईल असं राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं. तसेच त्‍यांनी येणारं नवं सरकार पाडण्याचा आम्‍ही प्रयत्‍न करणार नसून त्‍यांनी महाराष्‍ट्र हितासाठी काम करावं आमच्या त्‍यांना शुभेच्छा आहेत असेही ते म्हणाले.

हे ही वाचा : 

Back to top button