Latest

मारुती सुझुकीची ‘हनुमान उडी’ : बाजारमूल्य पोहोचले ४ लाख कोटींवर, गुंतवणुकदारांची चांदी | Maruti Suzuki

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीचे बाजारमूल्य बुधवारी ४ लाख कोटींच्या वर पोहोचले आहे. भारतीय शेअर बाजारावर नोंदणीकृत असणारी आणि ४ लाखांच्यावर बाजारमूल्य असणारी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही १९वी कंपनी ठरली आहे. २०२४ या वर्षांत मारुती सुझुकीचा शेअर तब्बल २३ टक्केंनी वधारला आहे, त्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात तगडी वाढ झालेली आहे.  (Maruti Suzuki)

मारुती सुझुकीच्या एका शेअरची किंमत बुधवारी दुपारी १२,६६९ इतकी झाली होती. RIL, TCS, HDFC Bank, Infosys, ICICI Bank, Bharti Airtel, SBI, LIC, HUL, ITC, L&T, Bajaj Finance, Adani Energy, Adani Green, HCL Tech, Adani Enterprises, Kotak Mahindra Bank आणि Adani Total Gas या कंपन्यांचे बाजारमूल्य सध्या ४ लाख कोटींच्यावर पोहोचले आहे. (Maruti Suzuki)

जपानचे चलन घसरल्याचा फायदा

जपानचे चलन असलेल्या येनमध्ये सातत्याने घसरण झालेली आहे. बुधवारी येन गेल्या ३४ वर्षांतील सर्वांत निच्चांकी पातळीवर पोहोचले होते. याचा फायदा मारुती सुझुकीला झाला आहे. जपानमधून वाहानांचे सुटे भाग मागवताना कंपनीला आता कमी किंमत मोजावी लागत आहे.

प्रिमियम कारची मोठी विक्री | Maruti Suzuki

तर दुसरीकडे मारुती सुझुकीच्या प्रिमियम प्रकारातील वाहनांच्या विक्रीत ६० टक्के इतकी वाढ झालेली आहे, तसेच निर्यातीत कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. विषेश करून Brezza, Grand Vitara आणि Fronx या मॉडेलना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे SUV प्रकारात मारुती आघाडी घेत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT