परभणी, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आज (दि.२) परभणी शहरात सकाळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवकांच्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मोर्चेकरांना आडविण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत युवकांनी स्टेशन रोडवरून दुकाने बंद केली.
शुक्रवारी (दि,१) रात्री परभणी शहरात एका एसटी बस व एका खाजगी ट्रॅव्हल्स वर दगडफेक करण्यात आली. दोन्ही बसचे नुकसान झाले. शहरातील ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बहुतांश दुकाने सकाळपासूनच बंद आहेत. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास जमावाने उर्वरित दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात मानवत व सोनपेठ येथेही बंद पुकारण्यात आला असून व्यापार पेठ कडकडीत बंद आहेत. (Maratha Reservation Protest )
हेही वाचा