Latest

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी नसरापूरमध्ये मोर्चाला सुरुवात

अमृता चौगुले

नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आणि आंतरवाली सराटी (जि.जालना) येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी(दि. ८) अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण नसरापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून मेनआळी नसरापूर ते चेलाडी फाटा (ता. भोर) सातारा महामार्गापर्यत निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने नसरापूर (ता. भोर) येथे मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा व उपोषण करण्यात आले. यावेळी एक मराठा, लाख मराठा, निर्धार मराठा आरक्षणाचा; लढा मराठ्यांच्या एकजूटीचा या घोषवाक्याने परिसर दणाणून गेला. मोर्चा रॅली पुणे-सातारा महामार्गावर आगेकूच झाली आहे. स्वराज्यभूमी भोर तालुक्यातील मराठा पुरुष व महिलांची प्रचंड गर्दी झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

नसरापूर येथील मेनआळी भैरवनाथ मंदिर पासून मराठा बांधवांनी हातामध्ये भगवे पताका व सरकार बाबत निषेधाच्या घोषणाचे फलक घेऊन बाजारपेठ गावातून मोर्चा रॅली काढली आहे. यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय पहायला मिळत आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा बांधवाना न्याय हक्क, नोकरीत आरक्षण आदी मुद्द्यावर आंदोलक कार्यकर्ते भूमिका मांडत आहे.

संपूर्ण दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण नसरापूर बाजारपेठ व इतर गावे बंदच्या आवाहनाला येथील व्यापारी व दुकानदारांनी देखील चांगला प्रतिसाद देण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आदी अधिकारी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुणे सातारा महामार्गावर दिवसभर उपोषणा केल्यानंतर आंदोलक आपल्या विविध मागणीचे निवेदन प्रशासनाला देणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT