Latest

सगेसोयरे कायदा मंजूर होणारच : मनोज जरांगे

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  मराठ्यांच्या जिवावर मोठे झालात आणि मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करता, बस झालं, आता यापुढे तुम्हाला आमच्या जिवावर मोठं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत मराठ्यांच्या जिवावर कोणालाच मोठं होऊ देणार नाही. जे आमच्या बाजूने बोलतात, आमच्या गोरगरीब लेकरांच्या कल्याणाचा विचार करतात, त्यांचाच आम्ही देखील विचार करू, असा घणाघात मनोज जरांगे यांनी आळंदीत विरोधकांवर केला. विरोधकांना मी एकटाच काफी आहे, त्यांना मी पुरून उरेल, जो माझ्याविरुद्ध बोलतो त्याच्यात दम असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावं, त्याला पुरून उरेल. मला त्याच्यात किती दम आहे, हेच पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. दि. 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे.

सगेसोयरे अध्यादेश पारीत होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहेच. त्यासाठी वेळेला जीव गेला तरी चालेल, मेलो तरी बेहत्तर, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
मंगळवारी (दि. 6) सायंकाळी मनोज जरांगे यांचे आळंदीत आगमन झाले. त्यांची प्रदक्षिणा रस्त्यावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची विजयी सभा पार पडली. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करीत संबोधित केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT