Latest

Manoj Jarange Patil Maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणातील वंशावळाची अट हटवा हीच आमची मुख्य मागणी आहे. आम्ही सरकारला दिलेल्या मुदतीचा उद्या शेवटाचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर बदला अन्यथा आंदोलन चालूच राहील, असा अल्टिमेटम मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनकर्ते, उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Manoj Jarange Patil Maratha reservation)

परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सरकारसोबत चर्तेसाठी तयार आहोत, परंतु मुख्यमंत्र्यांचा निरोप आला नाही. आज दुपारपर्यंत सरकारकडून निरोप येणार होता, पण तो आला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इथून पुढे कोणतेही उपचार घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (Manoj Jarange Patil Maratha reservation)

Manoj Jarange Patil Maratha reservation: आक्रमक झालेल्या तरूणांना आवाहन

जालन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभर मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झालेत. दरम्यान, याप्रश्नी एका तरूणाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, कायदा सुव्यवस्था बिघडेल असले कृत्य करू नका, गालबोट लागेल असे आंदोलन करू नका, आपण आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करू. आंदोलन शांतपणे झाले पाहिजे, असे आवाहन मराठा आरक्षणातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तरूणांना केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT