Latest

Manoj Jarange : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी पूर्वीच आचारसंहिता | ‘विश्वासघाता’मुळे जरांगे कडाडले; २४ तारखेला ठरणार पुढची दिशा

अविनाश सुतार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारने आचारसंहिता लागू करण्यापूर्वी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करुन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु, सरकारने विश्वासघात करुन धोका दिला आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि.२४) अंतरवाली सराटीत बैठक आयोजित केल्याची माहिती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.१७) अंतरवाली सराटीत दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Manoj Jarange

ते पुढे म्हणाले की, या बैठकीला राज्यभरातील उपोषणकर्ते, सभांचे आयोजक, आंदोलनकर्ते, वकील, अभ्यासक, साखळी उपोषणकर्ते आणि मराठा सेवक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ५ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. एक निर्णय, एक विचार, एक मत, ठरविण्यात येणार आहे. आता मराठा राजकीय सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. Manoj Jarange

अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने वेळोवेळी आश्वासन दिले. परंतु, शब्द पाळला नाही, उलट खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम गृहमंत्र्यांनी सुरु केले आहे, असा निशाणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता साधला. सध्या अंतरवाली सराटीच्या लोकांवर दबाव टाकणे सुरू आहे. अंतरवालीतील लोकांना बीड जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटनेत चौकशीसाठी तेथील पोलीस अधीक्षक बोलवतात. त्या घटनेशी यांचा काय संबंध ? असा सवाल करून आंदोलनाचे मुख्य केंद्र तुम्हाला बंद पाडायचे आहे का ?

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT