पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभेसाठी देशभरात निवडणूकींचा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान आपचे अनेक नेते दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधीत मनी लॉड्रींग प्रकरणात अडकले आहेत. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: या प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. (Manish sisodia interim bail)
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी अंतरिम जामिनासाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरून अंतरिम जामीन अर्ज दाखल केला आहे. जामीनासाठी केलेल्या अर्जात सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणात जामीन मागितला आहे.
मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज (दि.१२) दुपारी वाजता सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Manish sisodia interim bail)