Latest

Mandhardevi Kalubai Temple : महत्त्वाची बातमी! काळूबाई मंदिर उद्यापासून आठ दिवस राहणार बंद, ‘हे’ आहे कारण?

अमृता चौगुले

पुणे : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाईचे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी भाविक दर्शनसाठी गर्दी करत असतात. मात्र, उद्यापासून मांढरदेवी गडावरील काळुबाईच्या मुख्य मंदिराचा गाभारा आठ दिवस बंद ठेवला जाणार असल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे. 21 ते 28 सप्टेंबर या आठ दिवसाच्या काळात मंदिराचा मुख्य गाभारा बंद ठेवण्यात येणार आहे.

मांढरदेवी गडाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण मंदिराचा गाभारा बंद ठेवला जाणार आहे. मात्र, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन सभा मंडपात सुरू ठेवले जाणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष, सत्र जिल्हा न्यायाधीश यांनी कळविले आहे. या कालावधीत भाविकांना बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. मात्र कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नसल्याचे सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT