बेळगाव : रस्त्यावर आपटून पोटच्या पोरीचा खून | पुढारी

बेळगाव : रस्त्यावर आपटून पोटच्या पोरीचा खून

अंकली;पुढारी वृत्तसेवा :  रागाच्या भरात बापानेच स्वतःच्या चार महिन्याच्या बालिकेला डांबरी रस्त्यावर आपटून ठार मारल्याची घटना रायबाग तालुक्यातील चिंचलीत बुधवारी (दि. 20) घडली. संचिता बसाप्पा बळनुकी (वय 4) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर बसाप्पा रंगाप्पा बळनुकी असे तिच्या बापाचे नाव असून तो केएसआयएसएफमध्ये पोलिस आहे.

बसाप्पा हा अथणी तालुक्यातील दुरदुंडीतील रहिवासी आहे. त्याचा 19 महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्याच्या पत्नीचे माहेर चिंचली आहे. चिंचली तो पत्नीला आणण्यासाठी आला होता. पत्नीने आज सण असून उद्या जाऊया, असे म्हटल्यावर बसाप्पा बळनुकीला राग अनावर झाला. त्याने पत्नीला आजच जायचे, असे बजावले. तरीही पत्नीने न ऐकल्याने त्याने घरासमोर जाऊन आपल्या चार महिन्याच्या बालिकेला डांबरी रस्त्यावर जोराने आपटले.

Back to top button