Latest

Mamata Banerjee: ममता बॅनर्जीं यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे आज (दि.२७ जून) दुपारी २ वाजताच्या सुमारास इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सुरक्षित आल्याचे तृणमुल काँग्रेसचे नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हवामानातील कमी दृश्यतेमुळे ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तर पश्चिम बंगालमधील सेवोके एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्या जलपाईगुडी (प. बंगाल) जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर बागडोगरा याठिकाणी जात होत्या. दरम्यान पायलटने पश्चिम बंगालमधील सलुगारा येथील लष्कराच्या विमानतळावर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले. दरम्यान त्या सुरक्षित असल्याची माहिती तृणमुल काँग्रेसचे नेते बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामानातील दृश्यता कमी झाली आहे. तसेच पुढील काही वेळ तरी हवामान निरभ्र होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी प्रवासासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला आहे.  या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज (दि.२७ जून) दुपारपर्यंत कलकत्याला पोहोचायचे असल्याने, त्या रस्त्यावरून गाडीतून प्रवास करत आहेत. दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी देखील सीएम ममता बॅनर्जी यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे, असेही वृत्त एएनआयकडून देण्यात आले आहे.

Mamata Banerjee: मुसळधार पाऊस अन् खराब हवामानामुळे वाहतुकीला अडथळा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून हा देशातील बहुतांश राज्यांत सक्रीय झाला आहे. तसेच काही राज्यांत मान्सूनने वेग पकडायला सुरूवात केली आहे. दरम्यान देशातील काही राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अंदमान-निकोबार सह पश्चिम बंगाल, सिक्किम, पंजाब, हिमाचल, ओडिशा, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, सौराष्ट तसेच कच्छमधील काही भागात मुसळधार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राज्यात हवामान खराब असल्याने हवाई उड्डाण अन् वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT