Latest

Malaysia Plane Crash Viral Video : मलेशियात विमानाची हायवेवर चालत्या वाहनाला धडक; भीषण अपघातात 10 ठार (पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Malaysia Plane Crash Viral Video : मलेशियात गुरुवारी (दि. 17) विमानाचा भीषण अपघात घडला. मलेशियात एक विमान महामार्गांवर चालणाऱ्या वाहनांना थेट धडकले. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. मलेशियातील सेलांगोर येथे ही दुर्घटना घडली. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CAAM) ही माहिती दिली. पोलिसांनी विमान अपघाताबाबत सांगितले की, या अपघातात मृत्युमुखी पडलेले 8 लोक विमानात होते, तर कार चालक आणि मोटारसायकलस्वारासह विमानाच्या धडकेमुळे दोन जणांचा मृत्यू झाला.

Malaysia Plane Crash Viral Video : असा घडला अपघात

मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (सीएएएम) दिलेल्या माहितीनुसार, दोन क्रू मेंबर्स आणि सहा प्रवासी घेऊन निघालेले छोटे विमान होते. मलेशियाच्या सेलांगोर राज्यातील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात विमान कोसळले. CAAM ने दिलेल्या माहितीनुसार, विमान रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारला धडकले.

नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे प्रमुख नोरजमान महमूद यांनी सांगितले की, विमानाने लँगकावीच्या उत्तरेकडील रिसॉर्ट बेटावरून उड्डाण केले होते आणि ते राजधानी क्वालालंपूरच्या पश्चिमेकडील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळाकडे जात होते. द गार्डियनच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमान जेट व्हॅलेटने चालवले होते.

Malaysia Plane Crash Viral Video : मृतांमध्ये यांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, पहांगमधील एक राज्य विधानसभा सदस्य आणि एका विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही अपघातात मृत्यू झालेल्या 10 जणांचा समावेश आहे.

अपघाताची चौकशी करणार – अँथनी लॉक

मलेशियाचे राजा सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्याचवेळी मलेशियाचे वाहतूक मंत्री अँथनी लॉक यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जप्त करून त्याची चौकशी केली जाईल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT