Sudan Air Crash : सुदानमध्ये विमान कोसळले; ४ जवानांसह ९ जण ठार | पुढारी

Sudan Air Crash : सुदानमध्ये विमान कोसळले; ४ जवानांसह ९ जण ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदानमध्ये विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानतळावरच नागरी विमान कोसळले. यामध्ये लष्कराच्या चार जवानांसह ९ जण ठार झाले. रविवारी (दि. २४) पोर्ट सुदान विमानतळावर ही घटना घडली.

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे लष्कराने सांगितले. या अपघातात एका मुलीचा जीव वाचला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये सुदानची राजधानी खार्तूममध्ये लष्करी विमान कोसळले होते. या अपघातात विमानातील एका लेफ्टनंट कर्नलसह तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Back to top button