Latest

जपान पुन्‍हा भूकंपाने हादरले, त्‍सुनामीचा इशारा नाही

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जपानमध्ये पुन्‍हा एकदा ६.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला; परंतु अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, असे वृत्त 'एएफपी'ने दिले आहे. ( Major earthquake hits Japan )

जपानच्या हवामान विभानाने म्‍हटलं आहे की, मंगळवारी भूकंपाचा धक्‍का जपानच्या समुद्राच्या किनारपट्टीवर जाणवला. होन्शुच्या पश्चिम किनार्‍याजवळ भूकंपाचा धक्‍का जाणवला. मात्र अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

1 जानेवारी रोजी मध्य जपानच्या काही भागांना शक्तिशाली भूकंप झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांची संख्या 200 च्या वर गेली होती. १०० जण बेपत्ता आहे तर ५६५ नागरिक जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या. नोटो द्वीपकल्पातील पायाभूत सुविधा नष्ट झाल्या होत्‍या.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT