Latest

Mahindra Ambulance Car : महिंद्राने आणली ‘ॲम्ब्युलन्स कार’; बोलेरोचे नवे मॉडेल लॉन्च

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्रा कंपनीच्‍या बोलेरो एसयुव्हीची लाेकांमध्‍ये खूप क्रेझ आहे. आता या बोलेरोचे निओ प्लस मॉडेल लॉन्च झाले आहे. महिंद्राच्या बोलेरो निओ प्लसला एक विशेष ओळख प्राप्त करुन दिली आहे. हे मॉडेल रुग्णवाहिका कार म्हणून ओळखले जाणार आहे. (Mahindra Ambulance Car)

कार चाहत्यांमध्ये महिंद्राच्या नव्या निओ प्लस कारची खूप चर्चा होती. निओ प्लस हे मॉडेल २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता या कारचे नवे मॉडेल लॉन्च झाले आहे. हे नवे कार मॉडेल प्रवासी एसयूव्ही नसून तर रुग्णवाहिका (Mahindra Ambulance Car) आहे. या कारमध्ये वैद्यकीय उपकरणे असणार आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये असेल असे सांगण्यात आले आहे.

 महिंद्रा कंपनीने ॲम्ब्युलन्स कार का लॉन्च केली? Why Mahindra company launched ambulance car?

रुग्णवाहिकेच्‍या मागणीत वाढ झाली आहे. आगामी काळातील आरोग्य विषयक समस्या हे लक्षात घेऊन महिंद्राने बोलेरो निओ प्लस रुग्णवाहिका लॉन्च केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे सीईओ नलीकांत गोलगुंटा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बोलेरो निओ प्लस रुग्णवाहिका लॉन्च करून आम्ही राष्ट्र उभारणीशी संबंधित आमची बांधिलकी आणखी मजबूत करत आहोत. वनीकरण, अग्निशमन, जलसिंचन, पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलांनंतर आता बोलेरो रुग्णवाहिकेच्या रूपाने लोककल्याणाच्या कामात उपयुक्त ठरू लागली आहे. आमची एसयूव्ही शहरांपासून खेड्यांपर्यंत आरोग्यसेवेसाठी काम करेल, असेही त्‍यांनी सांगितले.

कशी असेल महिंद्राची ॲम्बुलन्स बोलेरो कार?

बोलेरो प्लॅटफॉर्मवर आधारित बोलेरो निओ प्लस रुग्णवाहिका थोडी लांब असेल. यामध्ये रुग्णांसाठी बेंच बेड असतील. याशिवाय, त्यामध्ये सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणे असतील. ही कार बॉडी-ऑन-फ्रेम आर्किटेक्चरवर आधारित असेल. 2.2 लीटर mHawk इंजिनने सुसज्ज असेल. याची कमाल शक्ती 120 HP आणि 280 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करेल, अशी क्षमता या इंजिनमध्ये असेल. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिसत आहे. बोलेरो निओ प्लस  ॲम्ब्युलन्समध्ये रियर व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आहे.

ॲम्ब्युलन्स कारमधील मेडिकल सुविधा

महिंद्रा बोलेरो निओ प्लस रुग्णवाहिकेत काही विशेष उपकरणे देण्यात आली आहेत. AIS:125 (भाग 1) नियम लक्षात घेऊन, यात एकल-व्यक्ती चालविण्यायोग्य स्ट्रेचर यंत्रणा, ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्था, वॉश बेसिन, आपत्कालीन परिस्थितीत उत्तम संवाद सुविधा, AC केबिन आणि D+4 बसण्याची व्यवस्था आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT