Latest

Mahesh Pithiya : ऑस्ट्रेलियाने सरावासाठी घेतली ‘डमी’ अश्विनची मदत!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. पहिल्‍या कसोटीसाठी या संघाने जोरदार तयारीही सुरु केली आहे. भारताविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियासमोर फिरकीचे आव्हान असणार आहे. भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रिलियन गोलंदाजांपुढे नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण १८ सामने खेळले असून, यामध्ये त्याने ८९ विकेट्स पटकावल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने रविचंद्रन अश्विनप्रमाणे गोलंदाजी करणारा एक 'भारतीय फिरकीपूट' आपल्या सरावसाठी घेतला आहे. (Mahesh Pithiya)

महीश पिथिया असे या  फिरकीपटूचे नाव आहे. जो सध्या नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. महिश पिथिया हा रविचंद्रन अश्विन प्रमाणे गोलंदाजी करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. सोशल मीडीयावरही त्याच्या गोलंदाजीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. (Mahesh Pithiya)

चहाच्या गाड्यावर काम करत होता महिश पिथिया (Mahesh Pithiya)

युवा फिरकीपटू महीश पिथिया हा भारताचा दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विन याच्याप्रमाणे गोलंदाजी करतो. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फिरकीला सामोरे जाता यावे, यासाठी महिश नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. तो यापूर्वी एका चहाच्या गाड्यावर काम करत होता.

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना महिश पिथिया म्हणाला, मी रविचंद्रन अश्विन यांना प्रथम २०१३ च्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत पाहिले होते. अश्विन त्यावेळी भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक होते. ते क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत होते. माझी आर्थिक परिस्थिती खराब असल्याने माझ्याकडे टीव्ही नव्हता. मी आमच्या शहरातील एका पानटपरीवर टीव्ही सुरू होता. त्यावेळी रविचंद्रन अश्विन यांना गोलंदाजी करताना पाहिले होते. मी एक वर्षापेक्षा जास्त काळ फतेहगंज येथे चहाच्या गाड्यावर काम केले. माझ्या क्लबने मला क्रिकेटचे बूट खरेदी करण्यास सहाय्य केले. इतर काही लोकांनी क्रिकेटचे किट विकत घेण्यास मदत केली. दिवसा क्रिकेट खेळणे आणि रात्री काम करणे फार कठीण होते. (Mahesh Pithiya)

महिश पिथियाला ऑक्टोबर २०२२ मध्ये बडोदा संघाकडून खेळण्‍याची संधी मिळाली होती.  रणजी ट्रॉफीमध्येही २०२२ मध्येच संधी मिळाली. पिथियाच्या ८ षटकार फटकावले आहेत. दरम्यान, आयपीएल २०२३ च्या लिलाव यादीत त्याचा समावेश नव्हता. आता कसोटी सामन्‍यात आर. अश्‍विनचा सामना करण्‍यासघठी ऑस्ट्रेलियन संघाने महिशच्‍या  गोलंदाजीवर सराव सुरु केला आहे. (Mahesh Pithiya)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT