Latest

Mahatma Gandhi as Mahishasura controversy : कोलकात्यात हिंदू महासभेने महात्मा गांधींना दाखवले महिषासुरच्या रुपात

अमृता चौगुले

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : एकीकडे देश महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत असताना कोलकात्यात हिंदू महासभेच्या दुर्गा देवी मंडळाने महिषासुर मर्दनीचा देखावा साकारला आहे.  यात त्यांनी महिषासुराच्या जागी महात्मा गांधी यांना दाखवले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Mahatma Gandhi as Mahishasura controversy)

कोलकातामध्ये नवरोत्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणोशोत्सवात मंडळे श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करतात तसेच पश्चिम बंगालमध्ये दुर्गा देवीची जागोजागी प्रतिष्ठापणा केली जाते. तसेच देवीसमोर देखावे उभे केले जातात. देवीला सुद्धा वेगवेगळ्या रुपात सजवले जाते. तसेच अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांच्या दुर्गादेवीच्या मंडळात दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनीच्या रुपात सजवण्यात आले होते. पण, विकृती म्हणजे यात त्यांनी महात्मा गांधी यांना महिषासुराच्या रुपात दाखले. या देखाव्यात दुर्गादेवी महिषासुराचे अर्थात गांधींचे वध करताना दिसत आहे. या देखाव्यामुळे कोलकातासह संपूर्ण देशात एक संतापाची लाट उठली आहे. (Mahatma Gandhi as Mahishasura controversy)

हा केवळ योगायोग

या प्रकरणातबाबत हिंदू महासभेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले, आम्हाचा कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. पोलिसांच्या सुचनेनुसार महिषासुराचा चेहरा बदलण्यात आला आहे. तो चेहरा गांधीं सारखा दिसतो हा केवळ योगायोग आहे. अशा प्रकारे हिंदू महासभेकडून या प्रकार केवळ अनावधानाने आणि योगायोगाने घडला आल्याची सारवासारव करण्यात येत आहे. (Mahatma Gandhi as Mahishasura controversy)

हा तर देशातील प्रत्येक नागरिकांचा अपमान

हिंदू महासभेकडून अत्यंत बालिशपणाची कारणे देण्यात येत असली तरी याचे पडसाद पश्चिम बंगालसह देशभर उमटत आहेत. याबाबत तृणमूल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की , "राष्टपिता महात्मा गांधी यांना असुराच्या रुपात दाखवणे हे अत्यंत घृणास्पद आहे. हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकांचा अपमान आहे. आशा प्रकारानंतर भाजप काय म्हणते? सर्वांनाच माहित आहे की, गांधींना मारणारा कोणत्याची विचारधारेच्या संघटनेशी निगडीत होता." (Mahatma Gandhi as Mahishasura controversy)

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT