Latest

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब विषयी ‘या’ गोष्टी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी कलाकार शिवाली परब हिच्याविषयी माहितीये का? शिवाली एक उत्तम विनोदी कलाकार आहे. हास्यजत्रेमध्ये तिचा अभिनय सर्वांनीचं पाहिला आहे. तिने अगदी काही काळातचं विनोदाच्या मंचावर आपले बस्तान बसवले. ती रिअल लाईमध्ये बोल्डदेखील आहे. जाणून घेऊया शिवाली परब विषयी.

शिवालीला नृत्याची आवड आहे. तिने सीएचएम कॉलेजमधून (चांदीबाई हिंमतलाल मनसुखानी कॉलेज, उल्हासनगर) युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यायची. उत्तुंग ही एकांकिका देखील तिने केली. तिला विभवांतर या एकांकिकामधील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालंय. ती उत्तम लावणी देखील करायची.

एक स्किट करताना पाहून अभिनेत्री नम्रता आवटे हिने तिला महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी बोलावलं होतं. नम्रताताईंनी दिलेल्या संधीमुळे आज मी संपूर्ण महाराष्ट्राला हसवू शकले, असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

दुसऱ्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, नृत्य करायला म्हणून आलेली मी एकांकिका, स्किट, सगळचं करू लागले. खरंतरं, त्या काळात मी एका सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. परीक्षाही दिली होती. आज जर नी युथ फेस्टिव्हलनध्ये आले नसते तर कदाचित मी सरकारी नोकरी करत असते. त्यामुळे युथ फेस्ट्व्हल माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

शिवालीने खूप कमी वेळेत हास्यजत्रेत आपलं स्थान प्रस्थापित केलं. पाय इन द स्काय, व्हॉट्सॲप लग्न आणि वेक अप या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. तिची पहिली मालिका हृदयात वाजे समथिंग होती.

नवाज, इरफान खान, मनोज वाजपेयी आणि अक्षय कुमार हे तिचे आवडते अभिनेते आहेत. तर रेखा, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या तिच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.

हायवे हा तिचा आवडता सिनेमा आहे. हम बने तुम बने ही आवडती मालिका आहे. तिला सवयंपाक करायलाही खूप आवडतं. तिला कोकणात फिरायला आवडतं. ती उत्तम योगासने करते. तिला पेंटिंग, गार्डनिंग, करायला आवडते.

हिंदीतही पदार्पण

व्हॉट्सॲप लव्ह आणि वेक अपमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर तिला हिंदी मालिकेची ऑफर मिळाली. सरगम की साढेसाती या मालिकेत तिने गुड्डीची व्यक्तीरेखा साकारली होती.गुड्डी हा व्यक्तीरेखा खूपचं उत्साही आणि बडबडी होती. महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या सेटवर तिला छोटी नमा असे म्हणायचे. अजूनही ती स्वत:ला बालिश समजते, हे विशेष.

SCROLL FOR NEXT