Latest

Maharashtra Police Recruitment 2023 : राज्यात ९८ हजार पोलिसांची करणार भरती

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी डेस्क : पोलीस कर्मचारी व लोकसंख्या यांचे प्रमाण सुधारण्यासाठी राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतके पोलीस कर्मचारी असून पोलिसांची हीच संख्या २२५ इतकी करण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या २.४५ लाख इतकी आहे. भरतीसंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेतला जाणार आहे. (Maharashtra Police Recruitment 2023)

संबंधित बातम्या :

अर्थ खात्याची उपसमिती व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती यांनी घेतलेल्या खातेनिहाय आढाव्यानुसार राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्यातील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, असे आम्ही सांगितले. हे काम झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त ९८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान ५० टक्के पदांना तरी मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, असे गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Maharashtra Police Recruitment 2023)

केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १५२.८० इतके आहे. नागालँडमध्ये हेच प्रमाण सर्वाधिक ११८९.३३ कर्मचारी तर बिहारमध्ये सर्वात कमी ७५.१६ कर्मचारी इतके आहे. (Maharashtra Police Recruitment 2023)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT