Latest

दिल्लीतील भाजप नेत्याला महाराष्ट्र सायबर सेलची नोटीस

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेश मीडिया प्रमुख नवीन कुमार यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर सेलने नोटीस बजावली आहे. एका ट्विट प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीनंतर मात्र भाजप नेत्याने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे पोलिसांचा धाक दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, हे अशक्य आहे. यापूर्वी देखील या नेत्यांच्या भष्ट्राचार उघडकीस आणला होता आणि भविष्यातही उघडकीस आणू असे नवीन कुमार म्‍हणाले.

पंजाब, राजस्थान नंतर आता महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी एका ट्विटर पोस्टवर सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटीस पाठवली आहे, अशी माहिती नवीन कुमार यांनी दिली. पंजाब पोलिसांनी मंगळवारी (दि.19) सकाळी नवीन कुमार यांची घरी जावून गुरूवार (दि.२१) एप्रिल रोजी मोहाली, पंजाब येथील पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे.

तपासा दरम्‍यान नवीन कुमार सहकार्य करीत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पंरतु, कुमार यांनी त्यांच्या वकिला मार्फत त्यांचा जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांकडून नोटीस मिळाल्यानंतर नवीन कुमार यांनी संबधित ट्विट पुन्हा करून या पोस्टमध्ये काय चुकीचे आहे? असा सवाल उपस्‍थित केला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT