पुढारी ऑनलाईन डेस्क :
महाविकास आघाडी सरकारचा २०२२-२०२३ वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडला. हा दिवस महाराष्ट्र जनतेसाठी महत्वपुर्ण असणार आहे. व्यापार वर्ग, शेतकरी बरोबरचं सर्वसामान्य जनतेचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहीले होते.
या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सांगितले की, हे वर्ष हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल. "महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे" असेही ते म्हणाले. (Maharashtra Budget 2022 )
अमृतमहोत्सवी महिला व बालभवन, नागरी बाल विकास केंद्र उभारली जाणार आहेत, एकात्मिक बाल विकास योजनेसाठी १ लाखापेक्षा अधिक अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा देण्यात येणार आहेत, महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. आदी तरदूदी महिलांसाठी करण्यात आल्या आहेत.