Latest

Madrasa Survey : युपीत सुमारे आठ हजार मदरसे बेकायदा, राज्‍य सरकारचे सर्वेक्षण पूर्ण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्‍यनाथ सरकारने मदरशांचे सर्वेक्षण ( Madrasa Survey ) पूर्ण केले आहे. राज्‍यात सुमारे आठ हजार मदरसे हे बेकायदा असल्‍याची माहिती या सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्‍ये मोठ्‍या प्रमाणावर बेकायदा मदरशांची उभारणी झाल्‍याचा आरोप केला जात होता. यासाठी मदरशांच्‍या सर्वेक्षण करण्‍याचा निर्णय योगी आदित्‍यनाथ सरकारने घेतला होता. त्‍यानुसार १० सप्‍टेंबर २०२२ पासून राज्‍यात सर्वेक्षण सुरु करण्‍यात आले होते.

या सर्वेक्षणामध्‍ये ( Madrasa Survey ) मदरशांचा आर्थिक उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत कोणता?, इमारत, पाणी, फर्निचर, वीज आणि स्‍वच्‍छतागृह सोय कशी आहे? मदरसा चालविणारी संस्‍था कोणती? , सरकारकडून मान्‍यात घेतली आहे का, मदरशांमध्‍ये असणारी विद्‍यार्थी संख्‍या आणि त्‍यांच्‍या सुरक्षेसाठीची उपाययोजना, अभ्‍यासक्रम आणि शिक्षकांची संख्‍या आदी प्रश्‍नांची उत्तरे या सर्वेक्षणात घेण्‍यात आली.

राज्‍यातील मदरसे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, राज्‍यात आठ हजारांहून अधिक बेकायदा मदरसे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. . आता संदर्भात सर्व जिल्‍हाधिकारी १५ नोव्‍हेंबरपर्यंत आपला अहवाल राज्‍य सरकारला पाठविणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. सर्वाधिक बेकायदा मदरसे मुरादाबाद जिल्‍ह्यात आहेत. तर दुसर्‍या आणि तिसर्‍या स्‍थानी बिजनौर आणि बस्‍ती हे जिल्‍हे आहेत. मदरसा बोर्डचे निबंधक जनमोहन सिंह यांच्‍या मते, राज्‍यात सुमारे आठ हजार बेकायदा मदरसे आहेत. मात्र जिल्‍हाधिकार्‍यांचा अहवाल आल्‍यानंतर याबाबतचा निश्‍चित आकडा स्‍पष्‍ट होईल, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT