Latest

Lumpi Disease: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात लम्पीचा कहर; 94 जनावरांचे बळी

अमृता चौगुले

पुणे : लम्पी स्किनच्या प्रादुर्भावाने पशुपालक धास्तावले आहेत. यंदा झालेल्या कमी पावसाने अगोदरच चार्‍याची अडचण झाली असताना लम्पीमुळे 94 जनावरांचे बळी गेले आहेत. ही बाब चिंता वाढवणारी असताना पशुसंवर्धन विभागाकडून केवळ लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्याचा दावा केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात 2 हजार 502 जनावरांना लम्पी स्किनची लागण झाली आहे. त्यापैकी 2 हजार 111 जनावरे बरे झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे 94 जनावरे दगावली असून, त्यामध्ये 29 गायी, 23 बैल आणि 42 वासरांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली, त्यामध्ये 98.5 टक्के जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT