Latest

Louise Brown : जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग कसा यशस्वी झाला? 

backup backup

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : आज २५ जुलै. याच दिवशी मानवी प्रजनन आणि प्रसूती विश्वात मोठी क्रांती घडली. आपण ४३ वर्षं मागे जाऊ. म्हणजेच साल १९७८, दिवस २५ जुलै. या दिवशी जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी सक्सेस झाली होती. त्या बेबीचं नाव होतं लुईस ब्राऊन (Louise Brown). ती आता त्रैचाळीशीत जातेय. तिच्या जन्मापासून सध्या ती काय करते… जाऊन घेऊ.

…असा झाला आयव्हीएफ तंत्रातून लुईस ब्राऊनचा जन्म

४४ वर्षांपूर्वीची गोष्ट. इंग्लंडच्या मॅंचेस्टरमध्ये ओल्जहॅम या गावात लेस्ली आणि जाॅन ब्राऊन या दाम्पत्याचा संसार सुरू होता. पण, दाम्पत्याची एक खंत होती. त्यांना ९ वर्षं मुलबाळ नव्हते. बरेच प्रयत्न केले. पण, त्यांना मुलबाळ झाले नाही.

शेवटी दोघांनी डाॅक्टरांचा सल्ला घायचं ठरवलं. १९७७ मध्ये दोघांनी ओल्डहम जनरल हाॅस्पिटलच्या पॅट्रिक स्टेप्टो आणि राॅबर्ट एडवर्ड या दोन डाॅक्टरांनी त्यांनी भेट घेतली.

लेस्ली-जाॅन ब्राऊन हे दाम्पत्यासोबत त्यांचं बाळ लुईस ब्राऊन

या दोन डाॅक्टरांनी 'मानवी गर्भाशिवाय वाढणारे गर्भ' याचे तंत्र शोधून काढले होते. पण, या तंत्राचा वापर करण्याची संधी त्यांनी मिळाली नव्हती.

लेस्ली आणि ब्राऊन यांच्या रुपाने त्यांनी त्याचा प्रयोग करण्याची नामी संधी मिळाली.

दोन्ही डाॅक्टरांनी या तंत्रज्ञानाबद्दल आणि प्रक्रियेबद्दल लेस्ली आणि ब्राऊन यांनी समजावून सांगितले. दोघांनी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

मानवाच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेच्या इतिहासात फार मोठा बदल होता.

आयव्हीएफ तंत्रामधून टेस्ट ट्यूब बेबी प्रयोग सुरू झाला. प्रयोगशाळेत हळुहळू तो गर्भ वाढू लागला. अखेर जुलै महिना उजाडला. हाॅस्पिटलच्या बाहेर पत्रकारांची आणि इतर नागरिकांची गर्दी झाली होती.

गर्दी इतकी होती की, हाॅस्पिटच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. गर्भानं पूर्णत्व प्राप्त केलं होतं. २५ जुलै १९७८ रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी सुंदर आणि गोंडस मुलीचा जन्म झाला. तिचं वजन होतं २ किलो ६०८ ग्रॅम.

चाळशीत पोहोचलेली लुईस बाऊन आणि तिचे आई-वडील

आरोग्य क्षेत्रात डाॅ.पेट्रिक स्टेप्टो आणि राॅबर्ट एडवर्ड यांनी क्रांतीच केली होती.

या यशस्वी प्रयोगाबद्दल डाॅ. पेट्रोक स्टेप्टो यांना इंग्लंडमधील सर्वोच समजला जाणारा 'फेलो ऑफ द राॅयल सोसायटी' पुरस्काराने सन्मानित केले. डाॅ. राॅबर्ट एडवर्ड यांना २०१० मध्ये 'नोबेल' पुरस्कारने गौरविण्यात आलं.

लुईस ब्राऊनच्या जन्मावरून नवा वाद

आयव्हीएफच्या तंत्रातून लुईस ब्राऊन (Louise Brown) जन्म झाला खरा. पण, धर्माच्या कट्टरतावाद्यांनी वेगवेगळे तर्क लावले.

इंग्लंडमधील धर्मगुरू पोप पाॅल सहावे म्हणाले की, "ज्या प्रमाणे कारखान्यात एखादी वस्तू तयार होते, त्याप्रमाणे बेबी फॅक्टरीमध्ये लुईस नावाचे उत्पादन तयार झाले आहे." लुईस ब्राऊनचा धर्म कोणता, हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

लुईला तिच्या धर्माबद्दल विचारलं की ती म्हणते, "मी कोणत्याच धर्माची नाही. पण, मला धर्म नाही हे एका अर्थाने बरेच झाले. कारण, मला हवं तेव्हा कुठल्याही धर्माचं आचरण करू शकते", तिचं हे वाक्य खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची परिभाषा अधोरेखित करतं.

लुईस आपल्या आत्मचरित्रात सांगते की, "त्या काळात माझ्या आई-वडिलांना हजारो पत्रे लिहिली गेली. त्या पत्रांमध्ये माझ्या जन्माबद्दलचा तिरस्कारच जास्त होता. एकाने तर रक्ताने पत्र लिहिलं होतं. टेस्ट ट्यूब बेबी निसर्गाच्या विरुद्ध आहे, असं त्यात लिहिलं होतं"

"धार्मिक नेत्यांनी आणि इतर लोकांनी कट्टर विरोध केलेला. एकाने टेस्ट ट्यूब पाठवली होती. धमकी दिली होती. सॅन फ्रान्सिस्कोहून आलेल्या या पार्सलमध्ये एक छोटा बॉक्स होता. यात एक कागदाचा तुकडा आणि टेस्ट ट्यूब बेबी वॉरंटी कार्ड, असे लिहिलेले एक कार्ड होते.

तिरस्कार करणारे संदेश येत असल्याने आई लेस्ली लुईसला घराबाहेर घेऊन जाण्यास घाबरत होती", असेही अनुभव लुईसने सांगितले आहेत.

लुईस ब्राऊन आणि तिचा पती वेल्सी मुलिंदर

सध्या लुईस ब्राऊन काय करते? 

लुईसने ४ सप्टेंबर २००४ मध्ये वयाच्या २६ वर्षी वेल्सी मुलिंदरशी विवाह केला. लग्नानंतर २ वर्षांनी कॅमराॅन नावाचा मुलगा झाला. नंतर २०१३ मध्ये पुन्हा लुईस आणि मुलिंदर यांना दुसरा मुलगा झाला. ही दोन्ही मुलं नैसर्गिक पद्धतीने झाली आहेत. सध्या लुईस आपल्या कुटुंबासहीत इंग्लंडमधील ब्रिस्टाॅल शहरात राहत आहे.

लुईस (Louise Brown) एक प्रसिद्ध लेखिका आहे. तिने आपल्या जीवनावर 'माय लाईफ एज द वर्ल्ड्स फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी' नावाचं आत्मचरित्रदेखील लिहिलं आहे. लुईस एक शिपिंग ऑफिसमध्ये काम करते आहे. आज लुईसचा ४३ वा वाढदिवस आहे. भलेही नैसर्गिकपणे लुईसचा जन्म झाला असेल, पण इतर कोणत्याही बाबतीत कमी नाहीये, हे तिनं सिद्ध केलेलं आहे.

पाहा व्हिडीओ : कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT