Latest

Ketaki Chitale : नांदेड रुग्णालय; ‘जात बघून सांगायचं संडास साफ करायला’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेड रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला सांगणारे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. काल गांधी जयंती झाली. काल देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण दोघे मिळून हे शौचालय साफ करु आणि मी स्वत: पाणी टाकून शौचालय साफ केलं, असे स्पष्टीकरण खासदार हेमंत पाटील यांनी दिलं. आता या प्रकारानंतर नेहमी चर्चेत राहिलेली अभिनेत्री केतकी चितळे हिला संताप अनावर झाला आहे. तिने (Ketaki Chitale) फेसबूक पोस्ट लिहून संताप व्यक्त केलाय. (Ketaki Chitale)

संबंधित बातम्या – 

फेसबूक पोस्टमध्ये काय लिहिलंय?

केतकी चितळेने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय-

"आता एका हॉस्पिटलच्या डीनला, हॉस्पिटलमधील संडास साफ करा हे त्याची जात बघून सांगायचे तर!!! आणि तराही राव आपल्याकडे खोट्या ॲट्रॉसिटी केसेस टाकल्या जात नाहीत. जय हो Atrocities Act, 1989. आम्ही सामन्य माणसांवर काय, तर आता कुठल्या पदालाही नाही सोडणार. #UniformCriminalLaw #OneNationOneLaw"

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील या प्रकाराची राज्यभर चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खासदार हेमंत पाटील गेले होते. तेथे अधिष्ठातांच्या दालनात जाऊन त्यांनी अधिष्ठाता व अन्य डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. टॉयलेटमध्ये जाऊन पाहणी केली आणि अधिष्ठाता व एका डॉक्टरला शौचालयाची सफाई करावला लावली. शौचालयाची सफाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील यांच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

खासदार हेमंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेचा संदेश दिला म्हणून मी सफाई करायला सांगितले होते, असे स्पष्टीकरण हेमंत पाटील यांनी दिले. ज्या ३६ बालकांचा मृत्यू झाला त्याच्या संदर्भात कुठेही चर्चा होत नाही, कोणतीही संघटना आंदोलन करत नाही. परंतु एका अधिष्ठताला आणि त्यांचेच शौचालय साफ करायला लावले म्हणून माझ्य़ावर अॕट्रॉसिटी गुन्हा दाखल होतोय, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याच्यामध्ये १०० टक्के राजकारण आहे.

SCROLL FOR NEXT