Latest

लोणावळ्यात मागील 24 तासात तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद

अमृता चौगुले

लोणावळा : लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून सलग धुव्वाधार पाऊस पडत असून आज सकाळपर्यंत 24 तासात लोणावळा शहरात तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हाच जोर अजून पुढील किमान पाच दिवस कायम राहील असा अंदाज वेध शाळेकडून वर्तविण्यात आला आहे. लोणावळा शहरात ४ आणि ५ जुलै  ला सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात 220 मिमी (8.66 इंच) पाऊस झाला आहे. लोणावळा शहरात आजपर्यंत 1522 मिमी (59.92 इंच) इतका पासून झाला आहे. तर मागील वर्षी आजपर्यंत 1176 मिमी (46.30 इंच) पाऊस झाला आहे.

सलग पडत असलेल्या पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली असून खंडाळ्यात खंडाळा पोलीस आऊटपोस्ट जवळ मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणी भरले असून याठिकाणी वाहनांचा वेग मंदावला आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांने दिल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT