Latest

Lok Sabha Elections 2024 | जळगावला 14, रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात, माघारीनंतर चित्र स्पष्ट

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ज‌ळगाव मतदारसंघात १४, तर रावेरमध्ये २४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगाव मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आणि 20 उमेदवार वैध ठरले. तर रावेरला 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.

जळगाव मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात असून, त्यात करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी ), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पक्ष) ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी) आदींचा समावेश आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार : रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पक्ष), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), अशोक बाबूराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडित ब्राह्मणे (वंचित बहुजन अघाडी) आदींचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT