Latest

Lok Sabha Election | काँग्रेसला धक्का! माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या सुनेने हाती घेतले ‘कमळ’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री माजी लोकसभा सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज (दि.३०) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांनी हा प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. (Lok Sabha Election)

दरम्यान, शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे बसवराज पाटील मुरूमकर हे काही दिवसापूर्वी भाजपवासी झाले होते. त्यावेळेसपासूनच अर्चना पाटील चाकूरकर या भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे अर्चना पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना त्यावेळी प्रवेश करता आला नाही आता मात्र तो योग जुळून आला आणि त्यांनी कमळ हाती घेतले. (Lok Sabha Election)

त्यांच्या भाजप प्रवेशामुळे लातूर आणि मराठवाड्यात सक्षम असे नेतृत्त्व मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT