Loksabha election | शिरूर मतदारसंघात डॉ. कोल्हेंची ‘ही’ ठरणार मुख्य अडचण

Loksabha election | शिरूर मतदारसंघात डॉ. कोल्हेंची ‘ही’ ठरणार मुख्य अडचण

नारायणगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव हेच उमेदवार असल्याने गेल्या निवडणुकीतील पराभवाने सावध झालेल्या आढळरावांशी सामना करताना कोल्हे यांना ही निवडणूक गेल्यावेळी एवढी एकतर्फी जाणार नाही. 2019 ला डॉ. कोल्हे यांना त्यांनी केलेला मालिकांमधील भूमिकेचा मोठा फायदा झाला होता, परंतु आता तशी फारशी परिस्थिती राहिलेली नाही. मतदारसंघात ते फारसे न फिरल्यामुळे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये जास्त बसण्याची शक्यता आहे. किंबहुना, हाच मुद्दा आढळराव यांच्याकडून मांडला जात आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांची कोरी पाटी होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची एकसंध ताकद त्यांच्या सोबतीला होती. कार्यकर्ते व नेत्यांनी वर्गणी काढून निवडणुकीचा सगळा खर्च भागवला. कोल्हे वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्यावर असलेली नाराजी आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर प्रथम अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीलादेखील उपस्थित होते. नंतर त्यांनी 'यू' टर्न घेत शरद पवारांसोबत राहिले. ऐनवेळी शेतकर्‍यांचा प्रश्न घेत आक्रोश मोर्चा काढला. परंतु केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हे यांनी काढलेला आक्रोश मोर्चा सगळ्याच मतदारांना पटला असे नाही.

हेहीव वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news