Latest

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये पाच लाखांची रोकड जप्त

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २९) पंचवटीमधील राहू हॉटेल परिसराजवळ कारवाई करत पाच लाखांची रोकड जप्त केल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार पेठ रोडवर सापळा रचण्यात आला. यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास एका वाहनातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून याबाबतची कारवाई सुरू हाेती. दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविले जाते. त्यासाठी पैसे, मद्य, निरनिराळ्या वस्तूंचा वापर केला जातो. मात्र, या घटना आचारसंहितेच्या कचाट्यात येत असल्याने त्या राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके तयार केली आहेत. तसेच विविध महामार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच पथकांकडूनही वॉच ठेवला जात आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT