Latest

Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; मराठवाड्यात ‘बैलजोडी’चा वरचष्मा

सोनाली जाधव
पं. जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या दोन पंतप्रधानांचे मृत्यू, चीन आणि पाकिस्तानशी झालेले युद्ध, काही भागात अवर्षण स्थिती, काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाच्या पार्श्‍वभूमीवर चौथ्या लोकसभेची निवडणूक गाजली. ही निवडणूक तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेली. यापूर्वी झालेल्या 62  च्या निवडणुकीत काँग्रेसने या भागातील सर्व जागा जिंकल्या होत्या.1967 ला बीडचा अपवाद वगळता उर्वरित सहाही जागांवर काँग्रेसची ' बैलांची जोडी ' निवडून आली. बैलांची जोडी हे काँग्रेसचे पहिल्या निवडणुकीपासून चिन्ह होते. 67 नंतर फूट पडल्यामुळे 1971 च्या निवडणुकीत ते बाद झाले, हा इतिहास वेगळा. (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 : जनसंघाचा दिवा घरोघरी लावा

1951 ला स्थापन झालेल्या जनसंघात रा. स्व. संघाच्या विचारांची मंडळी होती. पण कार्यकर्ते आणि नेते यांची वाणवा. दिवा हे चिन्ह असणार्‍या जनसंघाने 'जनसंघाचा दिवा घरोघरी लावा'  या घोषणा देत महारा  ष्ट्रात प्रथमच बहुतांश जागांवर उमेदवार उभे केले. संभाजीनगरात काँग्रेसचे भाऊराव देशमुख देशमुख हे निवडून आले. त्यांना 135,865 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाकपचे एस. जी. सरदेसाई यांना 52,401 मतांवर समाधान मानावे लागले. जनसंघाचे बी. गंगाधर यांना 37,883 मते पडली. जनसंघाचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिला. बीडमध्ये नानासाहेब पाटील निवडून आले, तेथेही जनसंघ तिसर्‍या क्रमांकावरच होता. जालन्यात विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले. जनसंघाचे पी. गोपाळराव तिसर्‍या स्थानी होते.  लातूर : तुळशीराम कांबळे,- नांदेड : व्यंकटराव तरोडेकर, धाराशिव : तुळशीराम पाटील, परभणी : शिवाजीराव देशमुख विजयी झाले. परभणीत के. आर. नरसिकर, धाराशिवला टी. एस. पाटील, नांदेडला गंजेवार हे जनसंघाचे उमेदवार पराभूत झाले.

( संग्रहित छायाचित्र : 1967 च्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पदाची शपथ घेतली. तत्कालिन राष्ट्रपती सर्वपल्‍ली राधाकृष्णन् यांच्यासोबत इंदिराजी व त्यांचे मंत्रिमंडळ)

कम्युनिस्ट, आरपीआयचे प्रभूत्व

बीडसारख्या भागात कम्युनिस्टने पाय रोवले होते. जनसंघाप्रमाणेच कशाचीही अपेक्षा न करता असणारे कार्यकर्ते व नेते यामुळे तेथे सातार्‍याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बाजी मारली. भाकपला संभाजीनगरात 20.1 टक्के, बीड 45 टक्के, जालना 27.5 टक्के, आरपीआयला लातुरात  35 टक्के, नांदेडला 32 टक्के, धाराशिवला 40 टक्के, परभणीत शेकापला 34.6 असे मतांचे प्रमाण होते.

जॉर्ज फर्नांडिस विजयी, शरद पवारांचा उदय

या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचे मुंबई येथील अनिभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील यांना कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभूत केले. 67 पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबत होत असत. त्यात काँग्रेसने सहा राज्यातील सरकार गमावले. या निवडणुकीत शरद पवार यांचा राजकीय पटलावर उदय झाला. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच विजयी झाले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT