Latest

Load Shedding : लोडशेडिंगच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; चक्क पॉवरहाऊसमध्ये सोडली मगर (Video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील संतप्त शेतकऱ्यांनी लोडशेडिंगच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन केले आहे. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.१९) हुबळी विद्युत पुरवठा कंपनीच्या (HESCOM) कार्यालयात चक्क मगर आणून सोडली आहे. रोनिहाळा गावातील शेतकऱ्यांना शेतात मोठी मगर दिसली. त्यानंतर त्यांनी या मगरीला ट्रॅक्टरमध्ये बांधून आणत पॉवरहाऊसमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोर नेले. (Load Shedding)

मगरीला अधिकाऱ्यांसमोर नेत शेतकऱ्यांनी काही  प्रश्न विचारले. रात्रीच्या वेळी साप, विंचू किंवा मगरीने दंश केल्यास आणि मरण आल्यास कोणती पावले उचणार? असा सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला. (Load Shedding) मगरीला अधिकाऱ्यांसमोर हजर करत दिवासाही अखंडित थ्री-फेज विजपुरवठा करण्यात यावा. कारण आमची पिके सुकून चालली आहेत, अशी मागणी शेतऱ्यांनी केली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मगरीची सुटका करत अलमट्टी नदीत सोडले. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. (Load Shedding)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT