Latest

दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला ; ओतूर हद्दीतील घटना

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अमिरघाट शिवारातून सासरवाडी असलेल्या अहिनवेवाडी येथे दुचाकीवरून जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याने अचानक हल्ला करून दुचाकीस्वाराच्या मांडीवर पंजा मारल्याने एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. अमोल वसंत ठिकेकर (वय ४५, रा. अमीरघाट, ओतूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास सारणी फाटा येथे घडली. या घटनेची माहीती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी अमोल ठिकेकर यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले आहेत. दरम्यान ओतूर व परिसरात बिबट्याची संख्या वाढती असल्याने रात्रीच्या सुमारास वावरताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT