नागपूर : पुढारी वृत्तसेवा, Legislative Council : शाळेमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांची दखल घेऊन प्रत्येक शाळेला सीसीटीव्ही सक्ती करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. शाळांमध्ये पालक समित्यांच्या सभा होतात की नाही, याचेही ऑडिट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Legislative Council : माटुंगा येथील मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेत झालेल्या घटनेबाबत भाजपच्या सदस्या उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, माटुंगा येथील घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली आहे. मात्र, यापुढे अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसविल्यास एकप्रकारचा धाक निर्माण होईल. अनुदानित शाळांना सीसीटीव्हीचा खर्च करणे शक्य आहे. मात्र, विनाअनुदानित शाळांच्या खर्चासाठी मार्ग काढण्याबाबत सरकार विचार करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Legislative Council : विद्यार्थिनींच्या सुरक्षेला शासनाचे प्राधान्य आहे. मात्र, सध्याच्या उपाययोजना अपुऱ्या असल्यामुळे त्यामध्ये भर टाकण्यासाठी शालेय शिक्षण आणि गृह विभागाची संयुक्त बैठक घेऊन कृती करण्याबाबत सूचना दिल्या जातील. लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी राज्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेस आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Legislative Council : सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी पोलिस दीदी यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळेच्या परिसरात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :