Latest

Laxmikant Berde death anniversary : लक्ष्मीकांत बेर्डेंची ‘ती’ इच्छा पूर्ण (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज (१६ डिसेंबर) स्मृतिदिन आहे. (Laxmikant Berde death anniversary ) त्‍यांनी २००४ रोजी जगाचा निरोप घेतला; पण आजदेखील त्याचा अभिनय रसिकांच्‍या मनात जिवंत राहिलाय. लक्ष्याची एक इच्छा आज पूर्ण झालीय. ती इच्छा काय आहे? यासंदर्भात त्याची पत्नी प्रिया बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे व्हिडिओमध्ये काय सांगतात पाहा. त्यांचा हा व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल होत आहे. (Laxmikant Berde death anniversary )

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्वानंदी बेर्डे दिसतेय. त्यानंतर तिची आई प्रिया बेर्डही दिसतात. यावेळी प्रिया बेर्डे लक्ष्य कला मंच स्थापन केल्याचे जाहीर करतात.

त्या व्हिडिओमध्ये म्हणतात-आम्ही आज लक्ष्य कला मंचाची स्थापना केलेली आहे. लक्ष्मीकांत बेर्च यांची इच्छा होती की, आपण अशा प्रकारची संस्था आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांसाठी असावी. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलाकारांना नवोदित कलाकारंना व्यासापीठ मिळावं, योग्य मार्गदर्शन मिळावं. सर्व कलाकारांना आमचं आवाहन आहे की, तुम्ही सर्वांनी आमच्या या लक्ष्या कलामंचामध्ये सामील व्हावं. यावेळी व्हिडिओमध्ये प्रिया आणि स्वानंदी यांच्यासोबत अभिनय बेर्डेही दिसत आहे. या व्हिडिओवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या कला मंचला अनेक युजर्स सोशल मीडियावर अभिनंदन करताना दिसत आहेत.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT