Latest

Punjab News: वृद्ध आईच्या मारहाणीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर: वकील मुलाला अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: 73 वर्षीय वृद्ध आईला खोलीत डांबून वारंवार अमानुषपणे मारहाण केली. तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणी वकील मुलगा याला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना पंजाबमधील चंदीगढ येथे घडली. आशा राणी असे पीडित वृद्धेचे तर अंकुर वर्मा मुलाचे आणि सुधा सुनेचे नाव आहे. हे सर्वजण पंजाबच्या रुपनगरमध्ये राहत आहेत. (Punjab News)

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आपल्याच घरात मुलगा, सून आणि नातू यांच्याकडून छळ आणि मारहाण होत असल्याचे वृद्धेने आपली मुलगी दीपशिखाला सांगितले होते. त्यानंतर दीपशिखाने घरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यानंतर हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. सीसीटीव्हीच्या व्हिडिओंमध्ये वृद्धेवर तिच्या कुटुंबाकडून अत्याचार आणि निर्दयीपणे मारहाण होत असल्याचे दिसून आले. (Punjab News)

त्याचबरोबर व्हिडिओंमध्ये अंकुर, त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा वृद्धेला निर्दयीपणे खोलीतील पसऱ्यात टाकताना दिसत आहे. तसेच अंकुर आईला ठोसे मारताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. सुधा आशा राणीला थप्पड मारताना आणि नातू तिला ओढत असल्याचेही दिसून येत आहे. ही घटना 19 सप्टेंबर, 21 ऑक्‍टोबर आणि 24
ऑक्‍टोबरला घडल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आशा राणीच्या पतीचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यानंतर तिने आपली मुलगी दीपशिखाला सांगितले होते की, तिचा मुलगा अंकुर वर्मा आणि त्याची पत्नी सुधा आपल्याला वारंवार मारहाण आणि छळ करत आहे. त्यानंतर दीपशिखाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले आणि तिने जे पाहिले ते पाहून ती थक्क झाली. या पुराव्याच्या आधारे मुलगा, सून आणि नातवाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT