Latest

Sukesh-Mika Singh : जॅकलिनवर कॉमेन्टस् करणं पडलं महागात; सुकेशने मीकाला पाठविली नोटीस

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाठग सुकेश चंद्रशेखरने लोकप्रिय गायक-संगीतकार मीका सिंहला ( Sukesh-Mika Singh ) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या सोशल मीडियावरील फोटोवर कॉमेन्टस केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या फोटोमध्ये जॅकलीन मार्शल आर्ट्स अॅक्शन फिल्मची प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबत दिसत आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसने गेल्या काही दिवसापूर्वी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून संगीतकार मीका सिंहने 'तू खूप सुंदर दिसत आहेस. सुकेशपेक्षाही खूपच ग्लॅमरस दिसतेस.' अशी कॉमेन्टस केली होती. यानंतर काही वेळाने मीकाने ही कॉमेन्टस डिलीटदेखील केली होती. मात्र, याच दरम्यान ही कॉमेन्टस खूपच व्हायरल झाली होती. यानंतर महाठग सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी मिका सिंहला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

या नोटीसमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्या वक्तव्यामुळे आमच्या क्लायंटच्या चारित्र्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल खूपच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे त्याला मीडियाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुकेशवर संकटे आणखी वाढवित चालली आहे. दरम्यान सतत सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. आमचा क्लायंट एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना भारतीय चित्रपट उद्योग, विविध व्यावसायिक घराणे आणि राजकीय वर्तुळात सद्भावना आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत: चे नाव कमावण्याची धडपड तुम्हाला चांगलीच माहिती आहे. त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही विपरित परिणाम झाला आहे.'

'तुम्हाला हे स्पष्ट करण्यात येत आहे की, आमच्या क्लायंटची बदनामी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी तुमच्याकडून हे जाणूनबुजून आणि बेताल कृत्य आहे. असे वक्तव्य आमचा क्लायंट सहन करणार नाही. तुमच्या या बदनामीकारक वर्तणुकीमुळे तुमच्यावर मानहानीचा गंभीर फौजदारी गुन्हा केला आहे. या घटनेमुळे तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान आमच्या क्लायंटची तुम्ही तात्काळ बिनशर्त माफी मागावी. आणखी त्रास देऊ नका.' असेही या नोटीसमध्ये म्हटलं आहे. ( Sukesh-Mika Singh )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT