Venice Film Festival : Jacqueline Fernandez च्या कर्वी फिगरवर खिळल्या नजरा | पुढारी

Venice Film Festival : Jacqueline Fernandez च्या कर्वी फिगरवर खिळल्या नजरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) सध्या ८० व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासात बिझी आहे. (Ciao Venice Film Festival) या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जॅकलिनचे (Jacqueline Fernandez) काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या सौंदर्याची झलक दिसतेय. ‘फतेह’ चित्रपटातील अभिनेत्रीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Ciao Venice Film Festival)

तिने आपले काही फोटोज शेअर करत Ciao Venice Film Festival for #ferrarimovie 🤍🤍🤍 अशी कॅप्शन लिहिलीय.
जॅकलिन केवळ चित्रपटांमुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. आता ती व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्याने तिची चर्चा होतेय.

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फेस्टिव्हलमधील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ‘फेरारी’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रेड कार्पेट दरम्यान हे फोटो क्लिक करण्यात आले होते. या फोटोंमध्ये जॅकलिन तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना दिसत आहे. आकर्षक ऑफ-व्हाईट पोशाख परिधान केलेली, अभिनेत्री तिच्या किलर सौंदर्याने सर्वांना वेड लावत आहे. जॅकलीन फर्नांडिसची ही छायाचित्रे इतकी सुंदर आहेत की तुमची नजर हटवणार नाही. शॉर्ट बॉडीकॉन व्हाईट ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये, हातात पर्स आणि पेन्सिल सँडल घालून जॅकलिनने कॅमेरा पर्सन्सना सुंदर पोझ दिले आहेत.

 

Back to top button