Latest

वकील न्यायालयात आभासी उपस्थित राहू शकतात; CJI डीवाय चंद्रचूड यांची माहिती

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आभासी मार्गानेही वकिलांचे म्हणणे ऐकून घेईल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केली. न्यायालयात येऊन बाजू मांडणे तसेच आभासी मार्गाने युक्तिवाद करणे, हे दोन्ही पर्याय वकिलांना उपलब्ध करुन दिले जात आहेत, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, वर्तमान पत्रांचा अहवालानुसर कोरोना केसेस खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत जर वकील न्यायालयात आभासी पद्धतीने उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यांना तशी मुभा देण्यात येत आहे. तसेच ते हायब्रिड मोडमध्ये अर्थात न्यायालयात येऊन बाजू मांडणे किंवा आभासी मार्गाने युक्तीवाद करणे दोन्ही प्रकारे वकील काम करू शकतात.

24 तासात वाढले कोरोनाचे 4435 रुग्ण

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४,४३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २३,०९१ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

याआधीच्या दिवशी देशात कोरोनाचे ३,०३८ नवे रुग्ण आढळून आले होते. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २१,१७९ वर पोहोचली होती. तर २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी २, जम्मू- काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता. तर केरळमध्ये कोरोनाने दोघांचा बळी घेतला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT