Latest

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ई-रक्त कोष’ पोर्टलचा शुभारंभ

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सफदरजंग रूग्णालयात आयोजित राष्ट्रीय रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत देशभरात ऐच्छिक रक्तदानाने मेगा अभियान सुरु करण्यात आले.

देशात राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस १ ऑक्टोबरला साजरा केला जातो. कार्यक्रमादरम्यान आरोग्य मंत्र्यांनी 'ई-रक्त कोष' पोर्टलचा शुभारंभ केला. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 'ब्लड यूनिट' साठवणुकीची मुबलक क्षमता आहे. रक्तदान शिबिरात लोकांनी मोठ्याप्रमाणत सहभाग नोंदवला तर देश जागतिक विक्रम प्रस्थापित करू शकेल. रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरित करून त्यांचा एक डेटाबेस तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT