Latest

लातूर : पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; सोनानगर येथील घटना

दिनेश चोरगे

लातूर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पतीने स्वतः फास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रवीण जाधव (वय २६ वर्षे) असे पतीचे तर अंकिता (वय २४ वर्षे) असे पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण जाधव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जखमी पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लातूर येथील सोनानगर भागात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ही घटना घडली.

काही दिवसापूर्वी दोघे पुण्याहून लातूरला

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील सोना नगरातील अंकिता हिचा विवाह वर्षभरापूर्वी प्रवीण जाधव याच्याशी झाला होता. ते दोघेही पुण्यात राहत होते. प्रवीण हा त्याच्या पत्नीस किरकोळ कारणावरून त्रास देत होता. स्वयंपाक येत नाही अशी व अन्य कारणे पुढे करून तो सतत तिला मारहाण करीत होता. काही दिवसापूर्वी ते पुण्याहून लातूरला राहायला आले होते.

मद्यपान करून केला खून करण्याचा प्रयत्न

मंगळवारी सायंकाळी प्रवीण मद्यपान करून घरी आला व किरकोळ कारणावरुन दोघात कुरबुर झाली. यावेळी त्याने पत्नी अंकिताच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. अंकितावर हल्ला होताच ती किंचाळल्याने शेजारच्यांनी धाव घेतली. त्यांनी जखमी अंकिताला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT