Latest

लातूर : भरधाव कार हॉटेलात घुसली; भीषण अपघातात २ जण ठार; ३ जखमी

निलेश पोतदार

लातूर; पुढारी वृतसेवा लातूर जिल्ह्यातील औसा शहरात एक भरधाव वेगात आलेली कार रस्ता सोडून चक्क हॉटेलात घुसली. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. वाजीदखान पठाण (वय ५७) व सोहेल शेख (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. त्यावेळी हॉटेलमधे असलेल्या अविनाश कांबळे (वय १४) या मुलाला कारची धडक बसल्‍याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. जखमींवर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

एमएच २४ बीआर ७८६८ ही कार लातूरकडे औसा–लातूर या महामार्गावरुन वेगात येत होती. ती औसा सीएनजी पंपानजीक आली असता यावेळी तेथील डिवायडरमधून अचानक समोर आलेल्या एमएच २४ एपी ६३१३ अॅटोला वाचवण्यासाठी कारचालक प्रयत्नात होता. यादरम्‍यान कारचा वेग नियत्रणात न आल्याने कार चक्क रस्‍त्‍याकडेला असलेल्या चहा नाश्त्याच्या हॉटेलात घुसली. या अपघातात तेथील खुर्च्यांचा चुराडा झाला.

यावेळी हॉटेलात आपल्या मावशीला मजुरीसाठी सोडायला आलेल्या ओंकार कांबळे (वय १६) या मुलाला या कारची जोराची धडक बसली. या भिषण धडकेत तो ५० फुट लांब असलेल्या हॉटेलच्या भिंतीवर आधळला. या अपघातात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. अपघातात कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेंपला गेला आहे. दरम्यान घटनास्थळाला सपोनि लोंढे यांनी भेट दिली व जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT